होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉच्या आठ परीक्षा पुढे ढकलल्या

लॉच्या आठ परीक्षा पुढे ढकलल्या

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:58AMमुंबई : प्रतिनिधी 

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा गेल्या आठवड्यात ढकलल्यानंतर आता लॉच्या आठ परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या आहेत. उशीरा लागलेले निकाल त्यात जाहीर झालेल्या परीक्षा यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे.

निकाल गोंधळाचा सर्वाधिक फटका हा लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे या रखडलेल्या निकालासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत विद्यार्थी वर्गाने केलेल्या मागणीनुसार विद्यापीठाने काही परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार विद्यापीठाने एलएलबी सेमिस्टर 1, पाच वर्षीय लॉ अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर पाच, एलएलबी सेमिस्टर पाच आदी विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यातील जवळपास सर्वच परीक्षा आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.याचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

Tags : Mumbai, eight, exam, postponed, law