Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › या सर्पदंशावर उतारा काय?

या सर्पदंशावर उतारा काय?

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी

सर्पदंश झाल्यावर त्यासाठी देण्यात येणार्‍या लसीचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असल्याचे काही घटनांमधून पुढे आले आहे. पूर्वी सर्पदंश झालेली व्यक्ती दोन किंवा तीन डोसनंतर ठणठणीत बरी व्हायची. मात्र आता त्यासाठी 25 ते 30 डोस घ्यावे लागतात. वेळेवर ड्रग्ज उपलब्ध न झाल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. 

मुंबईच्या परळ विभागात असलेल्या हाफकिन या रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भारतात महाराष्ट्र राज्य हे सर्पदंशाच्या घटना आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होण्याच्या प्रमाणामुळे आघाडीवर आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर 2017 मध्ये 33 हजार 673 केसेस आढळल्या आहेत. ज्यातून मृत्यू होण्याचे प्रमाणही जास्त आहे. भारतात दरवर्षी 2 ते 3 लाख सर्पदंशांच्या केसेस आढळतात. त्यातून 50 हजार रुग्णांचा मृत्यू होतो. मुंबईत एप्रिल ते ऑक्टोबर 2017 मध्ये 133 केसेस आढळल्या आहेत. त्यापाठोपाठा ठाण्यात 1 हजार 332 सर्पदंशाच्या केसेस आढळल्या आहेत. अनेकदा 70 टक्के साप ड्राय बाईट करतो. म्हणजे तो शरीरात विष टाकतोच असे नाही. पण, 30 टक्के साप चावतो म्हणजे त्याचे विष शरीरात पसरते.

एखाद्या व्यक्तीला सापाचा दंश झाला आणि त्याने शरीरात विष सोडले तर त्या व्यक्तीला तातडीने एएसवी म्हणजेच अँटी स्नेक वेनम नावाची लस दिली जाते. ज्याचा प्रभाव सध्या कमी होताना दिसत असल्याचे हाफकीन रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर डॉ. निशिगंधा नाईक यांनी सांगितले. सर्पदंशामध्ये महाराष्ट्र भारतात आघाडीवर आहे. एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर त्या व्यक्तीला 2 ते 3 लस दिल्या जायच्या. पण, आता त्यांचे प्रमाण जवळपास 25 ते 30 एवढ्यावर जाऊन पोहोचले आहे. त्यातून मृत्यूचेप्रमाण देखील वाढले आहे. परिणामी, आम्ही आणखी अँटी स्नेक लसींवर काम करत आहोत. आता अधिक प्रभावी लस कशा तयार करता येईल यावर संशोधन सुरू असल्याचे हापकिन ट्रेनिंग अँन्ड रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी सांगितले. मुंबईतही साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण, जिथे जास्त झाडी आहे, तिथे विषारी आणि बिनविषारी साप आढळू शकतात. मुंबईतही अशा बर्‍याच घटना घडतात, असेही त्या म्हणाल्या.