Thu, Sep 20, 2018 14:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिवा डम्पिंगला मध्यरात्री पुन्हा आग, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात (व्‍हिडिओ)

दिवा डम्पिंगला मध्यरात्री पुन्हा आग, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात (व्‍हिडिओ)

Published On: Mar 15 2018 7:40AM | Last Updated: Mar 15 2018 7:40AMठाणे : अमोल कदम

दिवा डम्पिंग ग्राऊंडला आग लागणे सुरुच असून या आगीपासून निघणाऱ्या धुरामुळे दिव्यातील नागरिकांचे जनजीवन धोक्‍यात आले आहे. परिसरातील नागरिकांना या धुरामुळे श्वसनाचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडत आहेत.

वारंवार नागरिक ठाणे महानगर पालिकेकडे डम्पिंग ग्राऊंडला कचरा टाकू नये या करिता तक्रार करत आहेत. याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वीच आग या डम्पिंग ग्राऊंडला लागली होती. या आगीमुळे जवळील चाळीतील नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. डम्पिंगमधील आग आटोक्यात आणून कचरा टाकणे, ठाणे महानगर पलिकेच्या घनकचरा विभागाने बंद करायचे तर  बाजूला असणाऱ्या अनधिकृत चाळीवर दिखाऊ कारवाई ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने केली. पण दिवा डम्पिंग ग्राऊंडला कचरा डंप करणे काही बंद झाले नाही. कल्याण परिसरात डम्पिंगच्या धुरापासून निघणाऱ्या त्रासाला कंटाळून नागरिक कल्याण परिसर सोडून जात आहेत. दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करा आणि या ठिकाणी लागणाऱ्या आगीपासून निघणाऱ्या विषारी धुरापासून आमचे जीवन वाचवा अशी मागणी  दिवेकर ठामपाकडे करताना दिसत आहेत.