Tue, Jan 21, 2020 05:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रोहा : आगीच्या तांडवात घर जळून खाक (video)

रोहा : आगीच्या तांडवात घर जळून खाक (video)

Last Updated: Dec 08 2019 8:04AM
रायगड : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील रोहा शहरातील आडवी बाजारपेठ बोरी गल्लीमध्ये लागलेल्या भीषण आगीत बाबूशेट रॉकेल वाला यांचे रिकामे घर जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, रोहा, नागोठणे येथील  अग्निशामक गाड्यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल (ता.१२) संध्याकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. त्यामुळे रोहा बाजारपेठ बोरी गल्ली शेजारी मनीला जैन यांच्या बंद घरामध्ये असलेल्या प्लास्टिक गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्यामुळे मनीला जैन यांचे मोठे नुकसान झाले. 

या घटनेत कोणीही गंभीर जखमी अथवा जीवितहानी झाली नसावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास रोहा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकचे अधिकारी हे करीत आहेत.