Wed, May 27, 2020 02:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना 'तयारी' नसल्याने तब्बल ४० कोटी जनता गरीबीच्या खाईत, तर २० कोटी नोकऱ्यांवर गंडातर!

कोरोना 'तयारी' नसल्याने तब्बल ४० कोटी जनता गरीबीच्या खाईत, तर २० कोटी नोकऱ्यांवर गंडातर!

Last Updated: Apr 08 2020 11:18AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशावर कोरोना संकट अधिक गंभीर होत चालले आहे. केंद्र सरकारकडून कोरोना विरोधात लढण्यासाठी पूर्णतः तयारी नसल्याने परस्थिती अधिक भयावह होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये सर्वांधिक हाल असंघटित क्षेत्रात विखुरलेल्या हातावरील पोटांचे होणार आहे.  

अधिक वाचा : कोरोनाग्रस्त वाढतच चालल्याने रेल्वेकडून पुन्हा मोठा निर्णय!

देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन  जाहीर करण्यात आल्याने असंघटित क्षेत्रातील तब्बल ४० कोटी जनता प्रभावित होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि पर्यायाने कमाईवर थेट परिणाम झाल्याने ही ४० कोटी जनता गरीबीच्या खाईत जाण्याची अटळ चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. संस्थेच्या मते, कोरोना संकटामुळे २०२० च्या दुसर्‍या तिमाहीत (एप्रिल-जून)  ६.७ टक्के कामकाजाचा काळ संपण्याची शंका आहे. म्हणजेच, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे दुसर्‍या तिमाहीत १९.५० कोटी फुल टाईम नोकऱ्यांवर पाणी फेरणार आहे.  

अधिक वाचा : कोरोनाची राजधानी वुहानसाठी तब्बल ७६ दिवसांनी लॉकडाऊनवरून मोठी बातमी!

आयएलओच्या म्हणण्यानुसार, भारत त्या देशांपैकी एक आहे जो परिस्थितीशी सामना करण्यास कमी तयार आहे. जिनिव्हामध्ये प्रसिद्ध झालेल्या आयएलओच्या अहवालानुसार, "कोरोना व्हायरसमुळे असंघटित क्षेत्रात काम करणारे लाखो लोक प्रभावित झाले आहेत." भारत, नायजेरिया आणि ब्राझीलमधील लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्याका कामगारांवर परिणाम झाला आहे.

अधिक वाचा : भारतानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची जागतिक आरोग्य संघटनेला धमकी!

अहवालानुसार, भारतातील जवळपास ९० टक्के लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. अशा परिस्थितीत सुमारे ४० कोटी कामगारांच्या रोजगारावर आणि उत्पन्नावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ते गरीबीच्या दुष्टचक्रात अडकणार आहेत.'

“सध्याच्या लॉकडाऊनचा या कामगारांवर मोठा परिणाम झाला आहे. काम बंद पडल्याने, त्यांच्यातील बरेच जण आपापल्या गावी परतले आहेत. ”आयएलओने म्हटले आहे की, कोरोनाच्या जागतिक साथीने कामकाज तासांवर आणि कमाईवर विपरित परिणाम झाला आहे. आयएलओच्या अहवालात सर्वाधिक बाधित क्षेत्राची रूपरेषा आहे आणि संकटावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपाय सुचवले आहेत.

अधिक वाचा : चिकन विक्री 20 टक्क्यांनी वाढली