रोह्यातील सरकारी गोडावूनचे पत्रे उडाले!

Last Updated: Jun 03 2020 12:50PM
Responsive image


रोहा : पुढारी वृत्तसेवा 

निसर्ग चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंर रोह्यात बुधवारी पावसाने दमदार पाऊस सुरु झाला आहे. सकाळपासूनच पावसाने रोह्यात सुरुवात केली. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दमदार पाऊस पडत आहे. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्याने रोह्यातील सरकारी गोडावूनवरील पत्रे उडून गेले आहेत. 

मंगळवारी सायंकाळी सुरुवात केलेल्या पावसाने रोहा शहरासह ग्रामीण भागात रात्रभर संततधार बरसला आहे. रोहा शहरास ग्रामीण भागात बिगरमोसमी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. रात्री काही काळ वीज खंडित झाली होती. परंतु वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित काम करुन वीज पुरवठा सुरळीत केला.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रोह्यात मंगळवारी प्रांताधिकारी यशवंत माने यांनी बैठक घेत नागरिकांनी सतर्क राहाण्याचे आवाहन केले. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागात दंवडी पिटविण्यात येत आहे. रोहा तालुका चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाला आहे. खाडी किनारी असलेल्या नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.