Wed, Mar 20, 2019 02:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र बंद : २०० आगारातील एसटी बंद 

महाराष्ट्र बंद : २०० आगारातील एसटी बंद 

Published On: Aug 09 2018 12:17PM | Last Updated: Aug 09 2018 12:17PMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

राज्यात आज सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळ ( एसटी ) ने राज्यातील सुमारे 200 हुन अधिक आगारातील एसटी वाहतूक बंद ठेवली आहे. स्थानिक पोलिसांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या एका अधिका-यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना दिली. 

राज्यातील 252 आग्रा प्रमुखांना स्थानिक पातळीवर पोलीसांनी बुधवारी सकाळी नोटीसाचा पाठवल्या. पुणे जिल्यात चाकण आणि सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, वर्धा, अमरावती, उस्मानाबाद याठिकाणी 25 जुलै रोजी 350 हून अधिक एसटी बसेसची  मोडतोड करून सुमारे 250 हून अधिक एसटी बसेस जाळण्यात आला.

त्यामध्ये शिवशाही, लालपरी, एशियाड सारख्या बसेसचा समावेश आहे. यामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. शिवाय उत्पन्नात मोठी घट झाली. आज ही या बसेसचे सांगाडे एसटी वर्क शाॅपमध्ये पडून आहेत. यामुळे  प्रवाशांच्या सेवेत असलेल्या 350 बसेस राज्यात एसटी ताफ्यातून कमी झाल्या. यामुळे आजच्या बंदमध्ये एसटीला धोका पोहचू नये यांची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आज पनवेल ST डेपो सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला.