Thu, Apr 25, 2019 06:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘त्या’ अल्पवयीन मुलीची आत्महत्या ब्ल्यू व्हेल गेममुळे ? 

‘त्या’ अल्पवयीन मुलीची आत्महत्या ब्ल्यू व्हेल गेममुळे ? 

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

कांदिवलीत 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने आठव्या माळ्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. या अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या अल्पवयीन मुलीने ब्ल्यू व्हेल गेम मुळे आत्महत्या केली आहे का, या शक्यतेचीही पडताळणी केली जात आहे.

हर्षिका धिरेंद्र मायावशी या नववीत शिकणार्‍या मुलीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. इमारतीवरुन उडी मारल्यावर तिला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी हर्षिताला मृत घोषित केले. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी हर्षिताच्या आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप हर्षिताच्या आई-वडिलांची चौकशी केलेली नाही. 

याप्रकरणी इमारतीतील सदस्य, सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. या अल्पवयीन मुलीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप गूढच आहे. यावर त्या कारणाचा शोध घेण्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.