Tue, Jun 25, 2019 15:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

डोंबिवली : वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Published On: Jul 12 2018 12:43PM | Last Updated: Jul 12 2018 12:43PMडोंबिवली : वार्ताहर

नांदीवली येथील नाल्यात मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास तोल जाऊन पडलेल्या हर्षल जिंदाल (24) या तरुणाचा दोन दिवसांपासून शोध लागला नव्ह घेण्यात येत होता. दरम्यान, वाहून गेलेल्या  एका तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आयरेगावातल्या ज्योतीनगर येथील नाल्यात सापडल्याचे वृत्त आहे. मात्र अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

डोंबिवली येथील नांदीवली नाल्यात मंगळवारी रात्री वाहून गेलेल्या तरुणाचा शोध पोलिस बचावपथकाच्या सहाय्याने घेत आहेत. अखेर गुरुवारी सकाळी अथक प्रयत्नानंतर  बचाव पथकांला एक मृतदेह सापडला आहे. 150 मिमी इतका तुफान पाऊस, नाल्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह, कोपर खाडीपर्यंत जाणाऱ्या या नाल्याच्या मोठा विस्तार, दोन्ही किनाऱ्यांना असलेली घनदाट झाडी, प्रचंड चिखल या सगळ्याची पर्वा न करता महसूल यंत्रणेने इतर यंत्रणांच्या मदतीने ही मोहीम अविश्रांत राबवून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. 

तरुणाच्या शोधकार्यात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्वत: बारकाईने लक्ष घातले होते. तपास यंत्रणांना वेळोवेळी ते सूचना देत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, प्रांत अधिकारी प्रसाद उकर्डे, तहसीलदार अमित सानप यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक यंत्रणा, नेव्ही, पोलिस, ठाणे पालिकेचे आपत्ती दल यांच्यात समन्वय ठेवून ही मोहीम यशस्वी केली. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.