Fri, Jul 19, 2019 05:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुळवड खेळून अंघोळीला गेलेला तरुण नदीत बुडाला

धुळवड खेळून अंघोळीला गेलेला तरुण नदीत बुडाला

Published On: Mar 02 2018 9:38PM | Last Updated: Mar 02 2018 9:38PMटिटवाळा : प्रतिनिधी

धुळवड खेळून झाल्यानंतर खडवली नदीत अंघोळीला आलेला मुलुंड यथे राहणारा भूषण म्हस्के (वय २५ ) हा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडालात अंदाज न आल्याने नदीत बुडाला आहे.

धुळवड खेळून झाल्यानंतर दरवर्षी  मुंबईसह ठाणे, कलवा, मुलुंड, मुंब्रा, दिवा, कल्याण, डोंबिवली,उल्हासनगर, बदलापूर, भिवंडी या ठिकाणाहून मोठ्या संख्येने धुळवडप्रेमी हे आंघोळीसाठी येत असतात. यावर्षीदेखील खडवली येथील भातसा नदीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये मुलुंड पश्चिम येथील केशव पाडा येथील आठ तरूण धुळवडीचा रंग काढण्यासाठी आंघोळीसाठी  दुपारी  खडवली येथील भातसा नदीवर आले होते. नदीच्या पात्रात अंघोळ करत असताना यातील भूषण म्हस्के याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात  बुडाला. सदर घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. त्याच्या मित्रांनी व इतरांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केली परंतू त्याला शोधण्यात यश आले नाही. याबाबत  स्थानिक खडवली पोलिसांना कळवले असता सह. पो. नि.  जितेंद्र आहिरराव यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करत आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन शोध मोहीम सुरू केली. मात्र अंधार पडल्याने अग्निशमन दलाला अडचण येत असून अद्याप भूषणचा शोध लागलेला नाही. शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याचे अहिरराव यांनी सांगितले. टिटवाळा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.