Sun, Aug 18, 2019 20:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘यंदाचा अर्थसंकल्‍प १० टक्‍के दिवाळी, ९० टक्‍के शिमगा’ (व्हिडिओ) 

‘यंदाचा अर्थसंकल्‍प १० टक्‍के दिवाळी, ९० टक्‍के शिमगा’ (व्हिडिओ) 

Published On: Feb 01 2018 4:10PM | Last Updated: Feb 01 2018 5:42PMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत २०१८-१९ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्‍प आहे. जीएसटीनंतर सादर केलेला सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्‍प असून, नोटाबंदी आणि जीएसटीने सामन्य जनता सरकारवर नाराज आहे. त्‍यामुळे यंदाचा अर्थसंकल्‍प हा १० टक्‍के दिवाळी आणि ९० टक्‍के शिमगा असल्‍याचे मत पुढारी ऑनलाईनचे अतिथी संपादक डॉ. एच. एम. देसरडा यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना आपले व्यक्‍त केले. 

डॉ.  देसरडा म्‍हणाले, ‘‘केंद्रातील सरकार अनेक योजनांच्या घोषणा करत सत्‍तेत आले. या सरकारकडून जनेतेच्या खूप अपेक्षा होत्‍या. मात्र, सरकारने दिलेल्‍या आश्वासनांची पूर्तता केली नाही. आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी राजकीय दृढ संल्‍पाची गरज आहे. या अर्थसंकल्‍पामुळे मागचीच परिस्‍थिती न बदलता ती जैसे थे आहे.’’

अर्थसंकल्‍प हा सरकारचा दस्‍ताऐवज आहे. यात कितीही तरतुदी केल्‍या तरी ते महत्‍वाचे नाही. कारण केलेल्‍या तरतुदी  प्रत्‍यक्षात उतरण्यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. अशी अपेक्षा डॉ. देसरडा यांनी व्यक्‍त केली.

यंदा सर्वसाधारण बजेटमध्‍ये रेल्‍वे अर्थसंकल्‍पाचाही समावेश करण्यात अला आहे. रेल्वेसाठी १ लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. संपूर्ण रेल्वे ब्रॉडगेज करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अरूण जेटली यांनी रेल्‍वेसाठी चांगल्‍या तरतूदी केल्‍या आहेत. असे मत डॉ. एच. एम. देसरडा यांनी व्यक्‍त केले. 

देसरडा म्‍हणाले, ‘‘गतवर्षापासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडणे बंद केले आहे. या वर्षी रेल्वेसाठी जेटलींनी जवळपास दीड लाख कोटींची तरतूद केली आहे. चार हजार मानवरहित रेल्वेफाटक, चार हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आदी योजना चांगल्याच आहेत, पण या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनवर जास्त भर दिल्याचे दिसून येते. भारतात दररोज जवळपास दीड कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. हा भार पेलण्यासाठी अमूलाग्र बदल होणे अपेक्षित होते. रेल्वे वाहतूक ही पर्यावरणाच्या दृष्टीने, इंधन बचतीच्या दृष्टीने आणि परवडणारी म्हणून सर्वात महत्त्वाची आहे. पण कोठेतरी अग्रक्रम चुकत आहे. बुलेट ट्रेन आणि विमान वाहतुकीला जास्त महत्त्व दिले गेले आहे. 

स्मार्टसिटी : 
‘‘देशातील निम्मी जनता आता शहरात राहात आहे. परंतु, त्यांच्यासाठी नियोजनबद्ध शहरे नाहीत. मुंबईसारख्या शहरात 60 टक्के नागरिक स्लम एरियात राहतात. त्यामुळे शहरे राहण्यायोग्‍य, आरोग्यदायी बनविण्यासाठी मोठी गुंतवणूक लागणार आहे. स्मार्टसिटीसाठी 2 लाख कोटींची तरतूद केली आहे. परंतु, ग्रामीण भागातील नगरनियोजनही महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यास मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढेल आणि त्यातून अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न उपस्थित होतील. सध्या रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. नियोजित रोजगार मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नगरनियोजन होणे गरजेचे असल्‍याचे मत डॉ. देसरडा यांनी व्यक्‍त केले. 

वस्‍त्रोद्योग : 
महाराष्‍ट्रात कापसाचे क्षेत्र मोठे आहे, त्‍यामुळे येथे वस्‍त्रोद्योगाला चांगला वाव आहे. मात्र, वस्‍त्रोद्याग जीएसटीखाली आणल्‍याने त्‍यावर प्रतिकुल परिणाम झाला आहे. या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार आहे, हा रोजगार संघटीत करता आला तर, शेतीमालाला चांगला भाव मिळेल.