Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मी सुखरूप काळजी करू नका : आमदार शिंदे

मी सुखरूप काळजी करू नका : आमदार शिंदे

Published On: Mar 05 2018 1:49PM | Last Updated: Mar 05 2018 2:33PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेवटचे गाव असणाऱ्या रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास जात असताना एक अपघात झाला. परंतु, मी सुखरूप आहे, हितचिंतकांनी काळजी करण्याचे कारण नाही. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे. 

वाचा : सातारा : आमदार शशिकांत शिंदेंच्या गाडीला अपघात 

दरम्यान, आमदार मकरंद पाटील यांच्या मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यात सत्‍काराच्या कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी रामेघर येथे जाण्यास उशीर झाल्याने त्यांची फॉर्च्युनर गाडी वेगात निघाली होती. यावेळी रविवारी रात्री जावळी तालुक्यातील आंधारी फाटा येथे आमदार शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने ते या अपघातातून सुखरुप बचावले. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या झाडांत अडकली होती.