Thu, May 23, 2019 15:05
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊद इब्राहिमचा हस्तक परवीनला अटक

दाऊद इब्राहिमचा हस्तक परवीनला अटक

Published On: Apr 27 2018 12:41PM | Last Updated: Apr 27 2018 12:41PMठाणे : पुढारी ऑनलाईन

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि अत्‍यंत विश्वासू तारिक परवीनला पोलिसांनी अटक केली आहे. परवीनला ठाणे खंडणी पथकाने मुंबई आझादनगर पोलिसांच्या हद्दीतून ताब्‍यात घेतले. १९९३ सालरी झालेल्‍या मुंबई बॉम्ब स्फोटमध्ये तारिकचे नाव होते. 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मां यांच्या नेतृत्वात तारिकला अटक करण्यात आली आहे. दाऊदच्या सारा सहारा मार्केटसाठी झालेल्या जमीन घोटाळ्यातही त्याचा हात होता. याआधी त्याचा भाऊ इक्बाल कासकर आणि टकला या दोघांना अटक झाली आहे. डॉनच्या तिन्ही विश्वासुंना पोलिसांनी ताब्‍यात घेतल्‍याने डॉनला मोठा हादरा  बसला आहे.

मुंब्र्यात गेल्‍या काही दिवसांपूर्वी एक हत्‍या झाली होती. या हत्‍येतही तारिक आरोपी होता, याच प्रकरणात त्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

Tags : mumbai, don dawood ibrahim, parvin, police