Sat, Jul 20, 2019 03:05



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कडोंमपाच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाला नगरसेविकेने ठोकले टाळे

कडोंमपाच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाला नगरसेविकेने ठोकले टाळे

Published On: May 17 2018 8:27PM | Last Updated: May 17 2018 8:27PM



डोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आय - 9 प्रभागातील अधिकारी व कर्मचारी काम करीत नसल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या माणेरे – वसार प्रभागाच्या नगरसेविका विमल भोईर यांनी गुरुवारी सकाळी प्रभाग क्षेत्र कार्यालयाला टाळे ठोकले. नगरसेविकेनेच टाळे ठोकल्‍याने  महापालिका अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा चव्हाट्यावर आला आहे.

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील आय - 9 प्रभाग क्षेत्रातील मूलभूत सुविधांची कामे होत नसल्याने या प्रभागातील नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्‍त करण्यात येत आहेत. त्‍या पार्श्वभूमिवर माणेरे-वसार प्रभागाच्या नगरसेविका भोईर यांनी अधिकारी, कर्मचार्‍याविषयी संताप व्यक्त करीत त्‍यांचा निषेध म्हणून आज प्रभाग क्षेत्र कार्यालयालाचं टाळे ठोकळे. या घटनेमुळे पालिका अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा समोर आला आहे.