होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माथेफिरू मुलाकडून आईवर हातोडी हल्ला

माथेफिरू मुलाकडून आईवर हातोडी हल्ला

Published On: Mar 22 2018 6:48PM | Last Updated: Mar 22 2018 6:48PMडोंबिवली : वार्ताहर

मानसिक तणावाखाली असलेल्या व विक्षिप्त वागणाऱ्या एका तरूणाने आपल्या जन्मदात्या आईवरच हातोडीने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली. आशुतोष ठाकूर असे या हल्लेखोर मनोरूग्णाचे नाव असून या हल्‍ल्‍यात त्‍याची आई अंजना या गंभीर जखमी झाल्‍या आहेत.

कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या सोनारपाडा-शंकरा नगरमधील बांगल्या दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या अंजना ठाकूर यांचा मुलगा आशुतोष (वय 19) हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असून, विक्षिप्तपणे वागत आहे. त्याचा विक्षिप्तपणा आईला चांगलाच महागात पडला आहे. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अंजना या घरात बसल्या होत्या. यावेळी अचानक आशुतोषने हातोडीने आपल्‍या आईवरच हल्ला केला. यात तोंड व चेहऱ्यावर हातोडीने प्रहार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर या प्रकरणी आशुतोष विरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Tags : dombivali ,women, injured, son, attack,crime