Thu, Jan 24, 2019 07:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › झाडाच्या सावलीत गाडी लावणे पडले महागात

झाडाच्या सावलीत गाडी लावणे पडले महागात

Published On: Apr 30 2018 5:32PM | Last Updated: Apr 30 2018 5:31PMडोंबिवली : प्रतिनिधी 

सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच जानवत आहे. काही लोक आपल्‍या बरोबरचं आपल्‍या वाहनांचीही तितकीच काळजी घेतात. त्‍यामुळेचं आपल्‍या गाडीलाही तीव्र उन्हापासून लांब ठेवण्यासाठी बरेच लोक गाडी पार्क करण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेत असतात. मात्र आज झाडाच्या सावलीत कार पार्क करणे चालकाला चांगलेच महागात पडले.

आज दुपारी १२ च्या सुमारास कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी कार चालकाने आपली कार झाडाच्या सावलीत पार्क केली, मात्र ज्‍या झाडाखाली कार पार्क केली तेच झाड कारवर पडल्‍याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. 

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी, कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. ही कार नेमकी कोणाची होती याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. खडकपाड्याच्या गोदरेज हिल परिसरात हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन कारवर पडलेले झाड कापून बाजूला केले. यापूर्वीही या परिसरात अशाच प्रकारच्या घटना झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.