Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळेच्या पहिल्‍या दिवशी मुलांची बैलगाडीतून मिरवणूक

शाळेच्या पहिल्‍या दिवशी मुलांची बैलगाडीतून मिरवणूक

Published On: Jun 15 2018 7:35PM | Last Updated: Jun 15 2018 7:35PMडोंबिवली : वार्ताहर

मे महिण्याच्या प्रदीर्घ सुट्‍टीनंतर आज शाळा मुलांनी गजबजल्‍या. माहाराष्‍ट्रातील बहुतांश शाळा आज सुरू झाल्‍या. अनेक ठिकानी शाळांकडून मुलांचा पहिला दिवस अविस्‍मरणीय करण्यासाठी अनेक उपक्रमांचं आयोजन केलं होत. कल्याण तालुक्यातील बापसई गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी आजचा दिवस विषेश होता. शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या पहिलीतील मुलांची बैलगाडीतून गावामध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली.  

बापसई गावातील जिल्हा परिषदेची शाळा 1954 साली सुरू करण्यात आली. इतर शाळेपेक्षा या शाळेतील मुलांचा पट चांगला आहे. नेहमी वेगळ्या उपक्रमातून अंकुश लहारे मुलांना आनंदी व त्यांच्या कलागुणांना वाव देत राहतात. अश्यातच यावर्षी देखील शाळेचा पहिला दिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पहिलीतील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली मिरवणूक ही साऱ्या गावासाठी अत्यंत वेगळा उपक्रम होता. काही कुटुंबानी तर विद्यार्थ्यांची आरती करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. मुलांना पाटी-पेन्सिल, पुस्तके वाटप करण्यात आली. विन होमच्या वतीने विशाल जाधव यांनी शिक्षणावर आधारित गीत घेतले व मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षक प्रणिता श्रीरामे, कोमल बनिया तसेच सि. रिचर्ड तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.