Sat, Nov 17, 2018 14:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीतील हॉटेल आगीत भस्मसात

डोंबिवलीतील हॉटेल आगीत भस्मसात

Published On: Apr 19 2018 4:18PM | Last Updated: Apr 19 2018 4:18PMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली पश्चिमेत स्टेशनजवळच्या हॉटेलला गुरूवारी दुपारच्या सुमारास  आग लागली. या आगीत डोंबिवली दरबार नावाचे हॉटेल जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

आग लागताच हॉटेलमधील लोकांनी बाहेर पळ काढला. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंब आणि पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी धाव घेतली. भडकलेल्या आगीवर तसेच आसपासच्या भागावर पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे आग इतरत्र पसरू शकली नाही. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या आगीत मोठी वित्त हानी झाल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.