Wed, Jul 17, 2019 11:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेवा-सुविधांसाठी मनपासमोर ढोल ताशा आंदोलन 

सेवा-सुविधांसाठी मनपासमोर ढोल ताशा आंदोलन 

Published On: Mar 19 2018 3:58PM | Last Updated: Mar 19 2018 3:58PMडोंबिवली : वार्ताहर

महापालिका नागरिकांकडून नियमानुसार कर वसूल करते मात्र नागरिकांना पुरेशा सेवा सुविधा देत नसल्‍याच्या कारणावरून नागरिकांनी आज अनोखे आंदोलन केले. कल्‍याण डोंबिवली महानगर पालिकेसमोर नागरिकांनी ढोल ताशा आंदोलन करत आपला रोष व्यक्‍त केला.

सेवा-सुविधांबाबत महापालिकेला जागे करण्यासाठी जागरूक नागरिकांनी ढोल ताशा वाजवून आपला रोष व्यक्त केला. महापालिका नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवा-सुविधा देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे सांगत गेल्या काही महिन्यांपासून ‘सेवा नाही तर कर नाही’ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आज हे अभिनव आंदोलन करण्यात आले. गेल्या 3 वर्षांपासून महापालिका क्षेत्रात कोणतीच विकासकामे झालेली नाहीत. तसेच मूलभूत सुविधांच्या नावाने तर बोंब सुरू असल्याचे सांगत येणाऱ्या काळात हीच परिस्थिती राहिल्यास सर्व प्रभाग समिती कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाईल अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिली.