Sat, Apr 20, 2019 17:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : रेल्वे रूळ ओलांडताना आरपीएफ जवानाचा मृत्यू

डोंबिवली : रेल्वे रूळ ओलांडताना आरपीएफ जवानाचा मृत्यू

Published On: Jan 04 2018 7:04PM | Last Updated: Jan 04 2018 7:04PM

बुकमार्क करा
डोंबिवली : प्रतिनिधी

मध्य रेल्वेवरील डोंबिवली आणि ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वे सुरक्षा बलातील जवान गिरीश मुझुमदार (वय 40) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.

ठाकुर्ली येथील खंबाळपाडा परिसरात लक्ष्मीपार्क सोसायटीत राहणारे मुझुमदार हे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कार्यरत होते. बुधवारी रात्री ते ड्युटी संपवून घरी चालले होते. ठाकुर्ली स्थानकातून कल्याणच्या दिशेने रूळ ओलांडताना हा अपघात घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे .