Sun, Jul 05, 2020 21:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १ लाखांची मागणी

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १ लाखांची मागणी

Published On: Dec 31 2017 6:55PM | Last Updated: Dec 31 2017 6:55PM

बुकमार्क करा
डोंबिवली : प्रतिनिधी

एका अल्पवयीन मुलीबरोबर फेसबुकवर मैत्री करणाऱ्या एका ब्लॅकमेलरने मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या तीच्याकडे तब्बल 1 लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्‍कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकिस आला आहे. पोलिसांनी पिडीत 17 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून हृतिक पवार उर्फ संजय घोडगे उर्फ शाम राणे या ब्लॅकमेलरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील मुलगी डोंबिवली पूर्व परिसरात राहते. तिची काही महिन्यांपूर्वी हृतिक पवार उर्फ संजय घोडगे उर्फ शाम राणे याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. कालांतराने ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. या ब्लॅकमेलरने सदर अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर समागम करतानाचे अश्लील फोटो देखिल काढले. काही दिवसांपूर्वी त्याने हे फोटो या मुलीला पाठविले. सदर फोटो तुझ्या बहिणीला पाठवतो असे सांगीतले तसेच हे फोटो कोणाच्या हाती जाउ नयेत असे वाटत असेल तर मला 1 लाख रुपये दे, अशी मागणी केली. या प्रकारामुळे मुलगी भयभीत झाली. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने थेट टिळकनगर पोलिस ठाणे गाठून घडलेले घटनाक्रम पुराव्यांसह कथन केले. पोलिसांनी पीडित मुलीच्या जबानीनुसार हृतिक पवार उर्फ संजय घोडगे उर्फ शाम राणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.