Sun, Jun 16, 2019 13:01
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : प्रवाशानेच पळवली रिक्षा।

कल्याण : प्रवाशानेच पळवली रिक्षा।

Published On: Jan 20 2018 4:48PM | Last Updated: Jan 20 2018 4:52PMडोंबिवली : प्रतिनिधी

रिक्षाचालक लघुशंकेसाठी खाली उतरला असताना रिक्षात बसलेल्या प्रवाशानेच रिक्षा चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार कल्‍याणमध्ये घडला आसून, कल्‍याणमध्ये दिवसेंदिवस चोरिच्या घटनांमध्ये वाढ होत असल्‍याचे समोर येत आहे.

कल्याण पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात राहणारा रवी पारबे हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.  बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रवी पारबे रिक्षा घेवून खडकपाडा सर्कल जवळून जात असताना एक प्रवासी भेटला. त्याला घेवून पारबे उल्हासनगर येथे पोहोचले. पारबे लघुशंकेसाठी रिक्षातून खाली उतरले. याच दरम्यान रिक्षात बसलेल्या प्रवाशाने ही संधी साधत रिक्षा सुरु करून तेथून पळ काढला. या नंतर तीन दिवस पारबे यांनी रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षा न मिळाल्याने अखेर त्यांनी या प्रकरणी महत्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .