Thu, Apr 25, 2019 23:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणच्या पेट्रोलपंपावर तरूणांचा राडा

कल्याणच्या पेट्रोलपंपावर तरूणांचा राडा

Published On: Dec 24 2017 7:53PM | Last Updated: Dec 24 2017 7:53PM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

कल्याणमधील एका पेट्रोलपंपावर शिल्लक कारणावरून जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पेट्रोल भरण्याच्या वादातून काही तरूणांनी पंपावरील कर्मचाऱ्याला बॅटने बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात हिंद पेट्रोल पंपावर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या तरुणाचा तेथे काम करणाऱ्या योगेश भोसले या कामगाराशी पेट्रोल भरण्यावरून वाद झाला. हा वाद सुरु असतानाच वाद घालणाऱ्या तरुणाचे आणखी 5 ते 6 साथीदार हातात बॅट घेऊन पेट्रोलपंपावर आले. या चौकडीने मिळून पेट्रोल पंपावरील कर्मचारी योगेश भोसले याला बदडून काढले. त्यानंतर आपल्या गाड्यांमध्ये जबरदस्तीने पेट्रोल भरून तेथून पोबारा केला. हा सर्व थरार पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात कर्मचारी योगेश भोसले याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे पोलीस फरार टोळक्यांचा शोध घेत आहेत.