Tue, Sep 25, 2018 10:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेला हॉकर्स भूषण द्यायचा का? : आठवले

मनसेला हॉकर्स भूषण द्यायचा का? : आठवले

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 1:29AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

मनसे जर मुख्यमंत्र्यांना भय्याभूषण पुरस्कार देणार असेल, तर मनसेला हॉकर्स भूषण पुरस्कार द्यायचा का? असा सवाल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केला. कल्याणनजीक मोहने गावात राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांना भय्याभूषण पुरस्कार द्या, अशा शब्दात मनसेने निशाणा साधला होता. यावर बोलताना आठवले म्हणाले की, मुंबईला वाढवण्यात मराठी माणसाचा वाटा आहेच, पण त्याचवेळी परप्रांतातून आलेल्या लोकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. शिवसेनेचाही उत्तर भारतीय संघ आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी जरा सामंजस्याने घ्यावे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या ठाणे जिल्हा शाखा आणि मोहने येथील नालंदा बुद्धविहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोहने आंबिवली येथे शुक्रवारी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता संविधान मिरवणुकीच्या दिंडीने संमेलनाची सुरुवात करण्यात आली.