Sun, Aug 18, 2019 14:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुंगीचे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार  

गुंगीचे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार  

Published On: Dec 28 2017 5:59PM | Last Updated: Dec 28 2017 5:59PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर तब्बल पाच जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात अत्याचाराप्रकरणी तक्रार दाखल केली असून, कल्याण तालुका पोलिसांनी एका महिलेसह तीन नराधमांना अटक केली आहे. तर ईतर दोनजण फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

छाया अर्जुन नाईकडे ( वय 45) अजय पातरकर (22) हरिशचंद्र गंगाराम गायकवाड (50) दशरथ पुंज मोखरे अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. विशेष म्हणजे या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या महिलेने पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेवून हे कृत्य केल्याचे उघड झाल्याने या आरोपी महिलेने स्त्री जातीला काळिमा फासला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार कल्याण तालुक्यातील म्हारळगाव परिसरातील चाळीत पीडित तरुणी आई वडिलांसोबत राहत होती. तिच्या आई-वडिलांमध्ये मतभेद झाल्याने पीडितेच्या वडिलांनी दुसरे लग्न करून सावत्र आई आणली. अशातच  तिच्या सख्या आईचे अलिबाग येथील मामाच्या गावी आजाराने निधन झाले. त्यामुळे पीडित तरुणीला तिची सावत्र आई नेहमी छळ करू लागली. याबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितले असता,वडिलांनी तू कमवून तुझा उदरनिर्वाह कर असे सांगीतल्याने पीडित तरुणी आठ महिन्यांपूर्वी टिटवाळा रेल्वे स्टेशनवर आली असता, या मुलीला तोंड ओळखीची एक महिला भेटली. या महिलेकडे संपूर्ण हकीकत सांगितल्यावर आपल्याला भाड्याने रूम पाहिजे म्हणून सांगितले. यामुळे तिने पीडित  तरुणीला आपल्या घरी नेले. आणि दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या मुलीसोबत मुख्य आरोपी छाया अर्जुन नाईकडे आली. तिला  सर्व घटना सांगितल्यानंतर नाईकडे या महिलेने आपल्यालाही एकच मुलगा आहे. मुलगी नाही मी तिला मुलगी म्हणून सांभाळ करते, असे बोलून त्‍या पीडितेला  इंदिरानगर येथील मस्जिद परिसराजवळील एका चाळीत भाड्याची खोली घेऊन दिली.  तेथेच आरोपी महिलेच्या बहिणीचा मुलगा अजय पातरकर व हरिश्चंद्र गायकवाड राहण्यास होते. दुसऱ्या दिवशी छाया नाईकडे हिने पीडित तरुणीस जबरदस्तीने दारू पाजून रात्री 12 वाजताच्या सुमारास रिक्षाचालक हरिश्चंद्र गायकवाड यास बोलवून तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. यामुळे पीडित तरुणीला त्रास होऊ लागल्याने तिला एका खाजगी दवाखान्यात नेऊन तिच्यावर उपचार करून पुन्हा घरी आणले. त्यानंतर आरोपी महिलेने सतत डॉक्टरने गोळ्या दिल्याच्या नावाखाली पीडित तरुणीला रात्रीच्या वेळी गुंगी आणणाऱ्या गोळ्या देऊन तिच्यावर अजय पातारकर या नराधमाने अत्‍याचार केला. त्यानंतर तिला रोजच गुंगीचे औषध पाजून तिच्यावर पाच महिने अत्याचार होतच राहिले. या अत्याचाराबाबत कोठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही पीडितेला दिली होती. त्यामुळे ती भयभीत झाली होती. तीन महिन्यायनपूर्वी पीडितेला आरोपींनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खोलीत राहावयास आणले. इथेही झोपेची गोळी देऊन तिच्यावर दादा शेठ नावाच्या नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर आरोपी महिलेने म्हारळ येथील एका लॉजवर नेऊन पाटील नावाच्या तिच्या मित्राला बोलवून तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान 24 डिसेंबर रोजी नराधम अजय व हरिश्चंद्र यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी  पीडित तरुणीने तेथून पळ काढून एका इमारतीचा आडोसा घेऊन लपून बसली. याठिकानी ही पीडिता रडत बसली असता, तीच्या रडण्याचा आवाज एकून त्या इमारतीतील एका महिलेने तिच्याकडे  विचारपूस केली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. या महिलेने पीडित तरुणीला महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत नोंद केली. गेली आठ महिन्यापासून तरुणीवर टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अत्याचार होत असल्याने हा गुन्हा टिटवाळा पोलिसांकडे  वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याच्या आधारे टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे मुख्य आरोपी छाया अर्जुन नाईकडे, अजय पातरकर, दशरथ पुंज मोखरे, हरिशचंद्र गंगाराम गायकवाड या चार आरोपीना शिताफीने अटक केली. त्‍यांना  कल्याण न्यायालयात हजर केले असता 1 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या गुन्ह्यातील दोन आरोपींचा शोध कल्याण तालुका  पोलीस घेत आहेत.