Wed, Jul 17, 2019 00:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पोलिसाच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On: Aug 11 2018 4:05PM | Last Updated: Aug 11 2018 4:07PMडोंबिवली : प्रतिनिधी 

माहेरून पैसे व सोने आणण्यासाठी पत्नीला मारहाण करणार्‍या तसेच तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या अनिल साळवी या पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या बहिणी विरोधात कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून, लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी सांगितले.

भायखळा येथील पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेला अनिल साळवे आपल्या कुटुंबासह कल्याण नजीक अटाळी येथे राहत होता. त्याचे सहा महिन्यापूर्वी प्रगतीश यांच्याशी लग्न झाले होते. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या प्रगतीला काही दिवसातच अनिल व त्याच्या बहिणीने त्रास देणे सुरु केले. प्रगतीचा पती अनिल व नणंद जिजाबाई हे दोघे तिला माहेरून सोने व पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. प्रगतीने नकार देताच या दोघांनी तिला शिवीगाळ मारहाण करत शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. गुरुवारी या जाचाला कंटाळून प्रगतीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी प्रगतीचे काका सुरेश जाधव यांनी प्रगतीचा पती अनिल व नणंद जिजाबाई या दोघांनी सोने व पैशांसाठी तिचा छळ केला व या जाचातून तिने आत्महत्या केल्यचा आरोप करत दोघां विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार प्रगतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत पती अनिल व नणंद जिजाबाई विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.