Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप स्मशानभूमीत (Video)

मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप स्मशानभूमीत (Video)

Published On: Feb 27 2018 3:44PM | Last Updated: Feb 27 2018 3:55PMकल्याण : वार्ताहर

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व मराठी भाषा जोपासण्यासाठी तसेच अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी, मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या साप्ताहाचा समारोप डोंबिवली पूर्व शिवमंदिर रोड वरील स्मशाभूमीच्या दारात करण्यात आला. 'मराठी भाषेला अभिजात दर्जा' मिळत नाही म्हणून निषेध करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन सप्‍ताहाचा समारोप या प्रकारे करण्यात आला. 

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या "टवाळकी"या काव्यसंग्राहाचे प्रकाशन केले. यावेळी साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासनाच्या अनास्थेच्या भूमिकेबाबत टीका करीत निषेध केला .

२७ फेब्रुवारीला राज्यभरात मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषेच्या संवर्धन आणि मराठी भाषा जोपासण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,  पुणे या संस्थेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने गत आठवडाभर कल्याण, अनगाव भिवंडी, अंबरनाथ, भिवंडी पडघा, मुरबाड टिटवाळा, मोहने येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

आज सकाळी मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप डोंबिवली पूर्व शिवमंदिर रोड वरील स्मशाभूमीच्या दारात करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश घुमटकर यांनी महाराष्ट्भर जागो जागी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असतानाच मसाप, कोमसाप अखिल मराठी साहित्य परिषद मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याला शासन दरबारातील काही अधिकारी उदासीन असून भाषेची गळचेपी होताना दिसत आहे. म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप समारंभाचे आयोजन  डोंबिवलीतील शिव मंदिर वैकुठ्वास येथे करण्यात आले. यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राधान्याने द्यावा, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. नुकत्याच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी इंग्रजीत केलेल्या भाषणाचे अनुवादित भाषण मराठी ऐवजी गुजराती मध्ये झाल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.