Wed, Apr 24, 2019 00:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जमिनीच्या व्यवहारात शिवसेना पदाधिकाऱ्याला लाखोंचा गंडा

जमिनीच्या व्यवहारात शिवसेना पदाधिकाऱ्याला लाखोंचा गंडा

Published On: Feb 12 2018 3:44PM | Last Updated: Feb 12 2018 3:45PMडोंबिवली : वार्ताहर

जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कल्याणमधील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला तब्बल पावणे पाच लाखांना चूना लावल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार मुरबाड येथे राहणाऱ्या भरत बोंबले नामक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

?कल्याणसह मुरबाड तालुक्यात जमिनींचे दर दिवसागणिक गगनाला भिडले  आहेत. एका जमीनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना शिवसेना पदाधिकारी रवींद्र पाटील यांच्या बाबतीत घडली आहे. जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात त्यांना 4 लाख 55 हजारांना गंडा घातल्याची घटना उघड झाली आहे. गेल्या वर्षी ऑगष्ट महिन्यात रवींद्र पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुरबाड तालुक्यातल्या पोटगाव येथे सुमारे 160 गुंठे जमिन खरेदी करण्यासाठी त्यांचा व्यवहार भरत बोंबले याच्याशी ठरला होता. या जमीन खरेदीसाठी एकूण 49 लाख देण्याचे ठरले. काही दिवसात पाटील यांनी कल्याणमधील आपल्या कार्यालयात ठरलेल्या रकमेमधील 4 लाख 55 हजार रुपये पाटील यांनी बोबले यांना देवू केले. त्यानंतर पाटील यांनी भरत बोंबले यांच्याकडे खरेदीखताचे दस्तऐवज करण्याची मागणी केली. मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही बोंबले याने खरेदीखत न करता टाळाटाळ केली. त्यामुळे पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पाटील यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिसांनी मुरबाड येथे राहणाऱ्या भरत बोंबले विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.