Sun, Jan 20, 2019 20:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेरीवाल्यांपुढे केडीएमसी प्रशासनाचे लोटांगण

फेरीवाल्यांपुढे केडीएमसी प्रशासनाचे लोटांगण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

एकीकडे डोंबिवलीच्या पश्चिमेला रेल्वे स्टेशन परिसरात एकही फेरीवाल्‍यात याठिकानी बसण्याची धमक होत नाही. मात्र दुसरीकडे उलटी परिस्थिती पूर्वेकडे आजही कायम आहे. उन्मत्त फेरीवाल्यांना हुसकावून लावण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या नाकाम अधिकाऱ्यांची येथून तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी पुढे आली आहे. ही मागणी काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या विभागीय कार्यालयात याच कारणासाठी ठाण मांडून बसलेल्या भाजपा नगसेरवकांनी केली आहे. मात्र महापालिकेकडे असा एकतरी अधिकारी दाखवा, आम्ही तात्काळ बदलीच्या मागे लागू असा पवित्रा स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांनी घेतला आहे.

पूर्वेला ग आणि फ प्रभाग क्षेत्रात न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली होत आहे. स्टेशनपासून 150 नव्हे तर चक्क 100 मीटरमध्ये फेरीवाले प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ठाण मांडून बसतात. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात अकार्यक्षम ठरलेले प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत आणि अमित पंडित या अधिकाऱ्यांची येथून तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी, असा रेटा नगरसेवकांनी लावला आहे. फ प्रभागामधून नगरसेवक विश्वदीप पवार तर ग मधून नितीन पाटील यांनी ही मागणी केली आहे. तर नगरसेवक विशू पेडणेकर यांनीही अधिकाऱ्यांचे काहीतरी साटेलोटे असल्याशिवाय फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचाआरोप केला आहे. महासभा असो वा दिल्लीतील केंद्राच्या सर्व्हेक्षणाची फेरी असो, फेरीवाले सक्तीच्या रजेवर जातात. मात्र त्यानंतर येरे माझ्या मागल्याची स्थिती असते. हा सर्व प्रकार फेरीवाले आणि अधिकारी यांच्या संगमतानेच होत असल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक पवार यांनी केला. अधिकारी केवळ मनुष्यबळाचे कारण पुढे करतात. त्यामुळेच ही समस्या सुटणे अवघड आहे. यासंदर्भात आम्ही आयुक्त गोविंद बोडके यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ नाही. जेव्हा चार प्रभाग मिळून 40-50 जणांचा स्टाफ दिला होता तेव्हा महिनाभर फेरीवाले बसले नव्हते. पुन्हा तसाच स्टाफ द्यावा, मी स्थिती नियंत्रणात आणतो अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे 

 परशुराम कुमावतम ग प्रभागक्षेत्र अधिकारी

मी फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत 21 जणांवर गुन्हे दाखल केले असून सोमवारीच एकावर अटकेची कारवाई झाली आहे. फ प्रभाग अधिकारी पंडीत यांनी मनुष्यबळाची विभागणी केली, अन्यथा हा प्रश्न उद्भवला नसता 

 विजय भामरे, फेरीवाला कारवाई पथक प्रमुख


  •