Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उपोषणकर्त्या डोंबिवलीकर शेतकरी पुत्राचे आंदोलन मागे

उपोषणकर्त्या डोंबिवलीकर शेतकरी पुत्राचे आंदोलन मागे

Published On: May 22 2018 10:05AM | Last Updated: May 22 2018 10:05AMडोंबिवली : वार्ताहर

आमरण उपोषणाचा इशारा दिलेल्‍या डोंबिवलीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाने उपोषण मागे घेतले. एमआयडीसीच्या प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात शासकीय धोरणानुसार देय असलेल्या साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करत होते. तसेच अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून आर्थिक पिळवणूकही होत होती. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आपले उपोषण मागे घेतले. वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांना शासन होण्यासाठी अनंता वझे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. 

डोंबिवली एमआयडीसीच्या प्रकल्पात १९६२ सालात मानपाडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी वामन वझे यांची २२ गुंठे उदरनिर्वाहाची शेतजमिन भूसंपादीत करण्यात आली होती. शासकीय धोरणानुसार संपादीत जमिनीच्या बदल्यात १२.५०टक्‍के भूखंड देणे अनिवार्य असताना संबंधीत अधिकारी विकसीत भूखंड देण्यास टाळाटाळ करत होते. एमआयडीच्या काही ठरावीक अधिकाऱ्यांनी हक्काच्या भूखंडासाठीही प्रकल्पग्रस्तांच्या वलिलांकडूनही पैसे उकळले होते. बेकायदेशीरपणे पैसे उकळूही भूखंड मिळत नसल्याच्या मानसिक धक्क्याने १८ एप्रिल २०१७ रोजी अनंता वझे यांच्या वडिलांचा मृत्‍यू झाला. 

आपल्‍या वलिलांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात प्रशासन कठोर भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ वझे यांनी सोमवारी एमआयडीसीच्या अंधेरी येथील मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या प्रकारामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तात्काळ त्‍यांची दखल घेतली. काही वेळातच उपमुख्य कार्यकारी अधिकारी  पी. डी. मलिकनेर यांनी उपोषणस्थळी उपस्थित आसलेल्या शिष्टमंडळाला पाचारण केले. घडलेली वास्तव परिस्थिती ऐकून उपोषणकर्त्यास उपोषण मागे घेताना संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास विनंती केली. 

भूखंड वाटपात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी अनंत वझे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.