होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्कारानंतर प्रेयसीला मित्राच्या मदतीने बेदम मारहाण

बलात्कारानंतर प्रेयसीला मित्राच्या मदतीने बेदम मारहाण

Published On: Jun 16 2018 9:27PM | Last Updated: Jun 16 2018 9:27PM



डोंबिवली : वार्ताहर

प्रियकराचे अन्य तरूणी सोबत प्रेमसबंध असल्याची माहिती समजल्याने जाब विचारण्यास गेलेल्या प्रेयसीला प्रियकराने आपल्या चार मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केली. शिवाय प्रियकरासह त्याच्या एका मित्राने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दगाबाज प्रियकराने वर्षभरापूर्वीच तिला प्रेमाच्या आणाभाका आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर जबरदस्‍ती बलात्कार केला असल्याचेही उघडकीस आले आहे.  

याप्रकरणी पीडितेने  मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत, तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी दगाबाज प्रियकरासह त्याच्या चार मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. शांतनू फारणे असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या दगाबाज प्रियकराचे नाव आहे. तर करण, अंजली, रिया, गौरी अशी इतर आरोपींचे नावे आहेत.
डोंबिवली मानपाडा पूर्व येथील कोळेगावातील एका चाळीत 27 वर्षीय तरुणी राहते. या तरुणीचे शांतनू फरणे या तरुणाशी वर्षभरापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर शांतनूने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत, तिला बहाण्याने हायवे रोडवर असलेल्या एका ढाब्याच्या मागील इमारतीमध्ये जून २०१७ रोजी नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. दरम्यान दगाबाज शांतनूचे एका मुलीसोबत प्रेमसबंध असल्याचे पीडित तरुणीला कळाले. तिने याबाबतची माहिती आपल्या मित्रांना दिली. ही बाब दगाबाज  शांतनूला कळताच तो संतापला आणि आपला मित्र करणला घेऊन पीडित तरुणीच्या घरी आला. त्यावेळी त्याने व त्याचा मित्राने पीडित तरुणीला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच तरुणीचे कपडे फाडत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने प्रतिकार करत आरडाओरड केल्याने दगाबाज शांतनू व त्याचा मित्र करण घाबरले. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे जवळच राहत असलेल्या अंजली, गौरी व रिया या तरुणींना बोलवले आणि पीडित तरुणी आपल्यावर खोटेनाटे आरोप करत असल्याचा कांगावा करत या पाचही आरोपींनी पीडितेला बेदम मारहाण केली.

धक्कादायक बाब म्हणजे पीडितेला तिच्याच घरात पाच दिवस डांबून ठेवले. तसेच याबाबत कुठे तक्रार केलीस तुझ्या लहान बहिनीला पळवून नेण्याची धमकी दिली. अखेर पीडित तरुणीने धाडस करून मानपाडा पोलीस ठाणे गाठत दगाबाज प्रियकरा विरोधात बलात्काराचा मित्र करणवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तर त्या तीन तरूणींवर बेदम मारहाण प्रकरणी तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दगाबाज शांतनू फारणे, करण, अंजली, रिया, गौरी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असून हे पाचही आरोपी फरार झाले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक झेंडे करीत आहेत.