Sun, Nov 18, 2018 19:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपच्या नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

भाजपच्या नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Published On: Jan 12 2018 8:01PM | Last Updated: Jan 12 2018 8:00PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्र.108 चे भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना उडविण्यासाठी शूटर्सना 1 कोटी रुपयांची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण सद्या गाजत असतानाच कोर्टानेही नगरसेवक महेश पाटील यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून जबर धक्का दिला.नगरसेवक कुणाल पाटील हे 27 गावांतील दावडीचे रहिवाशी आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्र.108 मधून भाजपा पुरस्कृत नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. दीड वर्षाने होणाऱ्या विधानसभेसाठी कल्याण ग्रामीणमधून आमदारकीचेही ते दावेदार मानले जातात. मात्र त्यांची हत्या करण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून, त्यापैकी 11 लाख रुपये डव्हान्सही घेतल्याची कबुली आरोपीने दिली होती. पोलिसांनी समांतर तापस सुरू असतानाच गणेशपुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 120 (ब), 302 सह 115 व आर्म्स ऍक्ट 325 अंतर्गत नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे, यांच्यासह इतर 11 जणांवर गुन्हे दाखल केल्याची कारवाई ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या सराईत आरोपीसह एकूण 6 जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडून 1 पिस्तुल, 1 रिव्हॉल्व्हर, 2 गावठी कट्टे, 16 जिवंत काडतुसे यासह 3 लाख 40 हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. तर नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय बाकाडे यांनी जामिनासाठी कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर शुक्रवारी अंतरिम सुनावणी झाली. या गुन्ह्यातील आरोपींकडून शस्त्रसाठा हस्तगत करणे बाकी आहे. तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. यावर जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एम. वाघमारे यांनी सदर आरोपींनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.