Sun, Sep 23, 2018 09:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नो एन्ट्रीत रोखल्याने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली बाईक 

नो एन्ट्रीत रोखल्याने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली बाईक 

Published On: Mar 06 2018 7:56PM | Last Updated: Mar 06 2018 7:56PMडोंबिवली : वार्ताहर

नो एन्ट्रीमधून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर बाईकचालकाने बाईक घातल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी शफक नियाज अहमद शेख व त्याचा जोडीदार दाऊद शोएल अन्सारी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण पश्चिमेकडील सुभाष चौकात शुक्रवारी सात वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी परळीकर वाहतूक नियोजनाचे काम करत होते. यावेळी रामबाग सुभाष चौकात नो एन्ट्रीमधून एक बाईक भरधाव वेगाने जात होती. यावेळी परळीकर यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या बाईकधारकाने बाईक थांबवण्याऐवजी परळीकर यांच्या अंगावर बाईक घातली. त्यामुळे परळीकर यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्या ठिकाणी असलेल्‍या प्रत्यक्षदर्शी ट्रॅफिक वॉर्डन तुषार शिरसाट याने त्यांचा पाठलाग करत थांबवले. यावेळी दुचाकीवर बसलेल्या शफक नियाज अहमद शेख व त्याचा साथीदार दाऊद शोएल अन्सारी या दोघांनी शिवीगाळ करत शिरसाट यांनाचं धक्काबुक्की केली. या अपघातात परळीकर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी बाईकस्वार शफक शेख व दाऊद अन्सारी या दोघांना अटक केली.