Wed, Jan 16, 2019 13:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : बेतवड्यातील भीषण आगीत गोडाऊन खाक

डोंबिवली : बेतवड्यातील भीषण आगीत गोडाऊन खाक

Published On: Feb 13 2018 8:24PM | Last Updated: Feb 13 2018 8:24PMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली जवळच्या संदप-बेतवडे येथील रूनवाल ग्रुपच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास आग लागली. या भीषण आगीत सदर गोडाऊन जळून खाक झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागातील संदप-बेतवडे येथील रूनवाल या टोलेजंग इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बिल्डिंग मटेरिल, पेंट आणि इलेक्ट्रीक सामनाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तेथील साहित्य आणि अन्य बांधकामाचे साहित्य जळून खाक झाले. सर्वत्र धुर पसरल्याने मोठी दुर्घटना वा स्फोट झाल्यासारखे वाटत होते. 

घटनास्थळी डोंबिवली फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र गोडाऊनच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. तथापी संध्याकाळपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत लाखोंचा माल जाळून खाक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.