Sun, Apr 21, 2019 00:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवीगाळीचा जाब विचारल्याने तरूणाची हत्या

शिवीगाळीचा जाब विचारल्याने तरूणाची हत्या

Published On: Mar 19 2018 4:52PM | Last Updated: Mar 19 2018 4:54PMडोंबिवली : वार्ताहर

शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरूणालाच बेदम मारहाण करत त्याचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरात घडली. संदेश घडशी असे मृत तरूणाचे नाव आहे. या मृत तरूणाच्या पत्नीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विनय ताम्हनकर, जान्हवी ताम्हनकर, तुषार आडवीलकर, नरेंद्र आडवीलकर, निहा आडवीलकर, या पाच जणांचा कोळसेवाडी पोलिसांकडून शोध सुरू आहे.

कल्याण पूर्वेकडील मलंग रोडला असलेल्या एका धाब्याजवळ शिवम हौसिंग सोसायटीची चाळ आहे. या चाळीत राहणारा संदेश घडशी हा रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारस चाळीतील एका दुकानात बसला होता. यावेळी विनय ताम्हनकर याने त्याला शिवीगाळ केली. विनाकारण शिवीगाळ करीत असल्याने संदेश याने विनयला जाब विचारला. त्यामुळे संतापलेला विजय रिक्षातून खाली उतरला. त्याने संदेश यांना मारहाण करत चाळीत ओढत नेले. तेथे विनयची पत्नी जान्हवी, मेव्हणा नरेंद्र, त्याची पत्नी निहा आणि नरेंद्रचा भाऊ तुषार या सगळ्यांनी मिळून संदेशला ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर नरेंद्रने संदेशचा गळा दाबून छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत संदेश गतप्राण झाला. या प्रकरणी मृत संदेशच्या पत्नीने तक्रार दाखल केली. त्‍यानुसार पोलिसांकडून विनय ताम्हनकर, जान्हवी ताम्हनकर, तुषार आडवीलकर, नरेंद्र आडवीलकर, निहा आडवीलकर या पाच जणांचा शोध सुरू आहे.