Sun, Jul 21, 2019 12:12



होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द 

 केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





डोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अर्जुन म्हात्रे यांनी देवळेकर यांच्या जात पडताळणी पत्र यापूर्वीच रद्द झाल्याचे कारण देत, याच मुद्द्यावर कल्याण न्यायालयात याचीका दाखल केली होती. या याचिकेवर आज गुरुवारी कल्याण न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे.

याच दरम्यान महापौर देवळेकर यांच्या वकिलांनी या आदेशावर स्थगिती मागितली असता. कल्याण न्यायालयाने उच्च न्यायालयात अपिलासाठी एक महिना मुदत दिली आहे. तर महापौर देवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता. कल्याण न्यायालयाने माझी निवडणूक रद्दबातल ठरवण्याचा निर्णय दिला. परंतु त्याच न्यायालयाने या निर्णयास उच्च न्यायालयात   अपील करेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली असून, उच्च न्यायालयात मला स्थगिती मिळेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.