Wed, Sep 18, 2019 10:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेल्फी व्हिडिओ काढून रेल्‍वेखाली मारली उडी

सेल्फी व्हिडिओ काढून रेल्‍वेखाली मारली उडी

Published On: Jul 31 2018 4:24PM | Last Updated: Jul 31 2018 4:24PMडोंबिवली : प्रतिनिधी 

प्रेयसीसोबत भांडण झाल्याने प्रियकराने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना विठ्ठलवाडी स्थानकात घडली. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी प्रियकराने मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडिओ काढला. या व्हिडिओमध्ये  आत्महत्येचे कारण सांगितले असुन हा  व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजेश भंडारी असे आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे.

मृत राजेश हा कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने गावात राहणारा होता. त्याचे त्याच परिसरातील एका तरुणीशी गेल्या 5 वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांच्या घरी यांच्या प्रेमसंबंधाची खबर लागल्याने तरुणीच्या घरच्यांनी आधी विरोध केला होता. तरीही या दोघांचे प्रेमसंबंध सुरुच होते. त्यानंतर दोघांच्या घरच्यांच्या सहमतीने त्यांचे लग्नही होणार होते. मात्र, गुरुवारी २६ जुलैला प्रेयसीने राजेशला विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी राजेश या ठिकाणी गेला असता, दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. यावेळी  रेल्वे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला होता. हा गोंधळ पाहून पोलीस कर्माचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन दोघांनाही तेथून हुसकावून लावले होते. मात्र, काही वेळाने राजेशने स्वत:च्या मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडीओ काढत, मी विठ्ठलवाडी स्टेशनजवळ उभा असून प्रेयसीच्या छळाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या करीत आहे. या मोबाईलमध्ये असलेला लॉककोड माझ्या मित्राला माहिती आहे. असा सेल्फी व्हिडिओ बनवत आत्‍महत्‍या केली होती. या घटनेची कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मात्र अद्याप कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex