Fri, Mar 22, 2019 05:53
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुत्रा भुंकल्याने मालकिनीसह कुत्र्याला हॉकिस्टिकने मारहाण

कुत्रा भुंकल्याने मालकिनीसह कुत्र्याला हॉकिस्टिकने मारहाण

Published On: Mar 10 2018 7:35PM | Last Updated: Mar 10 2018 7:35PMडोंबिवली : प्रतिनिधी

कुत्रा भुंकल्याने संतापलेल्या एकाने कुत्र्यासह त्याच्या मालकिनीला हॉकिस्टिकने मारहाण केल्याची विचित्र घटना कल्याण-शिळ मार्गावर लोढा-पलावा येथे घडली. कल्याण-शिळ मार्गावर लोढा-पलावा येथे राहणाऱ्या नितू उच्चील (वय ३१) ही महिला शुक्रवारी रात्री आठ वाजता आपल्या कुत्र्याला घराच्या परिसरात फिरवत होती. या दरम्यान एक अनोळखी व्‍यक्‍ती तिच्या समोरून कुत्रा घेऊन चालला होता.

अचानक उच्चील यांचा कुत्रा त्या कुत्र्यावर भुंकला. त्यामुळे उच्चील या सदर व्‍यक्‍तिची माफी मागण्यास गेल्या. मात्र त्‍या व्‍यक्‍तिने उच्चील यांना शिवीगाळ करत हॉकीस्टिकने मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या कुत्र्यालादेखील हॉकिस्टिकने झोडपून काढले. या हल्ल्यात जखमी झालेल्या उच्चील यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सदर हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.