Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिस्टर टॅलेंट; या क्यूट कुत्र्याची ॲक्टिंग एकदा बघाच! (Video)

मिस्टर टॅलेंट; या क्यूट कुत्र्याची ॲक्टिंग एकदा बघाच! (Video)

Published On: Jun 10 2018 11:55AM | Last Updated: Jun 10 2018 11:51AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही.  व्हिडिओ पाहून हे असे कसे काय होऊ शकते, याचाच प्रश्न तुम्हाला पडेल. आता एका कुत्र्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील हा कुत्रा क्यूट तर आहेच. पण, तो ॲक्टिंगही करत आहे. 

व्हिडिओत मालक कुत्र्याला गोळी मारण्याची ॲक्शन करतो. यानंतर तो कुत्राही जमिनीवर पडून मरण्याची ॲक्टिंग करतो. समोरून अधिकच फायरींग होत असल्याने कुत्राही गोळी लागल्याप्रमाणे ॲक्टिंग करतो.   

कुत्र्याचा हा व्हिडिओ भारतीय क्रिकेट फिरकीपटू हरभजन सिंग याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओला ‘मिस्टर टॅलेंट’ असे कॅप्शन त्याने दिले आहे. १५ तासातच हा व्हिडिओ ९० हजार जणांनी शेअर केला आहे.