Tue, Mar 26, 2019 02:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर व नेटकरी सरसावले

दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर व नेटकरी सरसावले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

नायर दंत महाविद्यालयातील डॉक्टर व नेटकर्‍यांनी जस्टीस फॉर दीपाली ही टॅगलाईन वापरत दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. दीपाली लहामाटे नायर रुग्णालयात काम करीत होत्या, मात्र 24 मार्चला रुग्णालयातून बाहेर पडताच एका भरधाव वेगाने येणार्‍या गाडीने त्यांना उडवले. या अपघातात डॉ. दीपाली यांचा बळी गेला, मात्र अपघातास जबाबदार असणार्‍या शिखा या श्रीमंत महिलेला अटक करून अवघ्या काही वेळातच सोडून देण्यात आले. यामुळे नायरच्या डॉक्टरांमध्ये संतापाची लाट पसरली असून दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी जस्टीस फॉर दीपाली ही मोहीमच सुरू केली आहे.

अपघातात डॉ. दीपाली गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने सहा दिवसांनंतर शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. याविषयी नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रेड यांनी सांगितले की, डॉ. दीपाली ही आमची विद्यार्थिनी होती. रस्ते अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्याने तिचा मृत्यू झाला. या अपघाताला जबाबदार असलेल्या शिखाला अटकही झाली, पण काही वेळातच तिला सोडून देण्यात आले. यावर आमचा आक्षेप असून दोषींवर कारवाई व्हावी, याकरिता रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी एकत्र येत न्यायासाठी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे.

डॉक्टरांची ऑनलाइन याचिका

डॉ. दीपालीला न्याय मिळावा यासाठी ऑनलाइन मोहीम राबवत असल्याचे नायर रुग्णालयातील इंटर्न बानी अधवयूने सांगितले. नायर दंत महाविद्यालय स्टुडंट असोसिशन या फेसबुक पेजवर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

अपघाताला दोषी असलेल्या शिखा नावाच्या मुलीला पुराव्याअभावी जामिनावर सोडण्यात आले आहे. या अपघातानंतर दीपालीच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. त्यामुळे www.change.org या संकेतस्थळाकर ऑनलाइन याचिका दाखल केल्याचेही बानी यांनी सांगितले.

Tags : mumbai news,  Deepali to get justice, helped, doctor, netkari,


  •