Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निरुपा रॉय यांच्या मुलांचा संपत्तीचा वाद विकोपाला 

निरुपा रॉय यांच्या मुलांमध्ये संपत्तीवरून ‘दिवार’

Published On: Jan 10 2018 4:27PM | Last Updated: Jan 10 2018 4:31PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची ‘माँ’ निरुपा रॉय यांच्या नेपियन सी रोडवरील घरावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद निर्माण झाला आहे. निरुपा रॉय यांना योगेश आणि किरण ही दोन मुले आहेत. त्यांच्यामधला संपत्तीवरुन वाद इतका विकोपाला गेला आहे की आता पोलिस कारवाई होण्याची शक्यता आहे. 

माझा मोठा भाऊ योगेशने मध्यरात्री दारूच्या नशेत मला मारहाण केली, अशी तक्रार किरणने मलबार हिल स्टेशन पोलिसांत केली आहे. रात्री ११ च्या सुमारास किरणने फोनद्वारे ही माहिती पोलिसांना कळवळी आहे.

‘योगेशने माझ्या घरात घुसून गलिच्छ भाषेत बोलण्यास सुरूवात केली. माझ्या घराच्या खिडक्याही तोडल्या तसेच माझ्या पत्नीला धक्काबुक्की केली व मलाही मारहाण केली, यानंतर मी मुलांसह एका रूममध्ये स्वत:ला बंद करून घेतले’, असे किरणने सांगितले. 

योगेशने धाकट्या भावाचे आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे की,‘किरण मला त्रास देण्यासाठी सतत त्याच्या घराचे लाईट आणि एसी सुरू ठेवतो. कारण त्यांचे बिल मी भरतो. मी त्याच्या पत्नीला मारहाण केलेली नाही’

किरण आणि योगेश ग्राऊंड फ्लोअरला चार बेडरूम असलेल्या घरात राहतात. हे घर निरूपा रॉय यांनी १९६३ मध्ये १० लाखाला खरेदी केले होते. सध्या या घराची किंमत १०० कोटी इतकी सांगितली जात आहे. या घराच्या आवारात मोठा बगिचा देखील आहे. निरुपा रॉय यांच्या पतीच्या निधनांनंतर मुलांमध्ये हा वाद वाढला आहे.