Sun, Aug 25, 2019 12:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महेश मांजरेकरांचा मनसेला जय महाराष्ट्र? जाणार ‘या’ पक्षात 

महेश मांजरेकरांचा मनसेला जय महाराष्ट्र?; जाणार ‘या’ पक्षात 

Published On: Apr 26 2018 1:48PM | Last Updated: Apr 26 2018 1:48PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची मुलगी अश्‍वमी बॉलिवूडमध्‍ये पदार्पण करण्‍यास सज्‍ज असताना आणखी एक चर्चा सुरू आहे, ती म्‍हणजे महेश मांजरेकर यांचा राजकीय प्रवेशाची. सध्‍या महेश मांजरेकर मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालक म्‍हणून जबाबदारी सांभळताहेत. आता ते राजकारणात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षच उरले आहे. त्‍यात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय काँग्रेसचा मार्ग धरणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. तसेच महेश मांजरेकर देखील काँग्रेसच्‍या वाटेवर असल्‍याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.   

काँग्रेसच्‍या एका वरीष्‍ठ नेत्‍याने एका इंग्रजी वेबपोर्टलने दिलेल्‍या माहितीनुसार, मे महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्‍यात मुंबईमध्‍ये मांजरेकर यांच्‍या पक्ष प्रवेशासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. 

महेश मांजरेकर यांनी २०१४ मध्ये उत्तर-पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. महेश मांजरेकर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे मित्र आहेत. त्यामुळे मांजरेकर काँग्रेसमध्‍ये जाणार असल्‍याचं म्‍हटलं जातयं. 
 

Tags : director mahesh manjrekar, congress, Raj Thackeray, Ashok Chavan