Fri, Feb 22, 2019 05:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गिरगाव चौपाटीवर वाहून आला डॉल्फिनचा मृतदेह

गिरगाव चौपाटीवर वाहून आला डॉल्फिनचा मृतदेह

Published On: Jul 29 2018 10:54AM | Last Updated: Jul 29 2018 10:54AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील गिरगाव चौपाटीवरदेखील आठ फुटांच्या डॉल्फिनचा मृतदेह वाहून आला आहे. समुद्रातील प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यूत वाढ होत आहे. जुलै महिन्यात मुंबईनजीकच्या किनार्‍यावर मृतावस्थेत डॉल्फिन वाहून येण्याची ही चौथी घटना आहे. तर गेल्या वर्षभरात मृतावस्थेत डॉल्फिन वाहून येण्याची ही नववी घटना आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास वर्दळ असलेल्या किनार्‍यावर हंम्पबॅग डॉल्फिन मृतावस्थेत आढळला. डॉल्फिनचा मृत्यू कदाचित 72 तासांपूर्वी झाला असावा, त्यानंतर तो मृतावस्थेत किनार्‍याजवळ वाहून आल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. उरणच्या केगाव येथील खारखंड परिसरामध्ये गुरुवारी सुमारे 25 फुटांचा मृतावस्थेतील डॉल्फिन वाहून आला. याच खारखंड परिसरात 14 जूनला एक महाकाय असा मृतावस्थेतील ब्ल्यू व्हेलदेखील आढळून आला होता. 

समुद्रातील प्रदूषण आणि जलवाहतुकीमुळे  समुद्रामध्ये वाढलेली जहाजे यामुळे समुद्री जीवांना धोका पोहोचत आहेत. 2016 पासून किनार्‍यावर महाकाय माशांचे मृतदेह वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर ठोस उपाय करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच संरक्षित जातीच्या माशांची सुरक्षा कशी करता येईल याचीही पाहणी संबंधित विभागांनी करण्याची मागणीही येऊ लागली आहे.