Fri, Oct 19, 2018 22:05



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी इमारतीजवळ स्फोट 

धायरीतील तो स्फोट प्रेमभंगातून 

Published On: Aug 10 2018 8:10PM | Last Updated: Aug 11 2018 1:21AM



पुणे : प्रतिनिधी 

धायरीतील डिएसके रोडवरील आलोक पार्क इमारतीजवळ स्फोट केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तरुणसोबत प्रेमभंग झाल्यानंतर तिला धडा शिकविण्यासाठी तिच्या घराजवळ स्फोट केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

किशोर आत्मराम मोडक (20, वडकी, सासवड रोड) व अक्षय राजाभाऊ सोमवंशी (24, वडकी) अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथे डिएसके रोडवरील आलोक पार्क इमारतीजवळ बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास फटाक्यासारख्या स्फोटाने परिसरात दहशत पसरली होती. एका खिडकीची काचही या स्फोटाने फुटली. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच तेथील सीसीटिव्ही तपासले. त्यानंतर या परिसरात दोघांनी चारचाकी वाहनातून येऊन स्फोट केल्याचे समोर आल्यावर त्या गाडीचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले.  

किशोर मोडक याच्याकडे चौकशी केली असता त्याने डिएसके रोड परिसरात त्याची मावशी राहते. तो मावशीकडे नेहमी येत जात असतो. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणार्‍या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर त्यांचा प्रेमभंग झाला. याच रागातून त्याने या तरुणीला धडा शिकविण्यासाठी ती राहत असलेल्या परिसरात स्फोट केला. असे सांगितले. या प्रकऱणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

 ही कामगिरी परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरि÷ष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे संगीता यादव, महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती गडकरी, पोलिस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे कर्मचारी रफिक नदाफ, दयानंद तेलंगे पाटील, व इतर कर्माचारी यांच्या पथकाने केली.