Mon, Apr 22, 2019 21:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धर्मा पाटील आत्महत्या, मोबदला प्रकरणाची माजी न्यायाधिशांमार्फत चौकशी

धर्मा पाटील आत्महत्या, मोबदला प्रकरणाची माजी न्यायाधिशांमार्फत चौकशी

Published On: Apr 06 2018 5:18PM | Last Updated: Apr 06 2018 5:08PMमुंबई : प्रतिनिधी

ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही, म्हणून धुळे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात येऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश शाम दर्णे याची नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील २२ जानेवारी रोजी केलेल्या आत्महत्या प्रकरणी घटनाक्रमाची चौकशी करणे. तसेच त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर दाखविलेल्या ६५० आंब्याच्या झाडांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबतच्या मागणीची नियमानुसार तपासणी करण्यात येणार आहे. 

मौजे विखरण गावातील जमीन धारकांच्या झाडांचे मूल्यांकन करताना रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून संगनमताने मूल्यांकनाच्या किंमतीत वाढ करून जास्तीची रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिलेली आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात यावी, अशी कार्यकक्षा माजी न्यायाधीशांच्या चौकशी समितीला ठरवून देण्यात आली आहे.