Tue, May 21, 2019 18:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : धर्मा पाटील यांचे पार्थिव धुळ्याला रवाना 

मुंबई : धर्मा पाटील यांचे पार्थिव धुळ्याला रवाना 

Published On: Jan 29 2018 4:43PM | Last Updated: Jan 29 2018 5:13PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने  धुळे जिल्ह्यातील जेष्ठ शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रविवारी रात्री मुंबईतील जे.जे. रुग्‍णालयात ८० वर्षीय धर्मा पाटील यांचे निधन झाले. मुलांनी वडिलांचे पार्थिव स्विकारण्यास नकार दिला होता. सरकारचे आश्वासन मिळाल्यानंतर मुलांनी वडिलांचे पार्थिव ताब्यात घेतले. 

‏धर्मा पाटील यांच्या मुलांनी मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याचे सांगत वडिलांचे पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला होता. ‘आम्हाला आश्‍वासन नको तर आमच्या जमिनीचा योग्य मोबदला लिखित स्वरूपात देण्याची मागणी पाटील कुटुंबीयांनी केली होती. रूग्णालयाबाहेरच आंदोलनही करण्यात आले होते. यानंतर सरकारकडून लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतरच मुलांनी धर्मा पाटील यांचे पार्थिव ताब्यात घेतले. पार्थिव धुळ्याच्या दिशेने रवानाही झाले. 

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर अनेक नेत्यांनी सरकारवर टिका केली आहे. सर्वच स्तरातून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 
 

कोण आहेत धर्मा पाटील 

धर्मा पाटील धुळे जिल्ह्यातील रहिवाशी होते. सरकारकडून जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती.  पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली होती. वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणाऱ्या यंत्रणेकडून देण्यात आलेला मोबदला योग्य नसल्याचा आरोप करीत ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

संबंधित बातम्या : 

धर्मा पाटील कर्जबाजारी?, निरूपम यांचे अज्ञान

हा तर सरकारी अनास्थेचा बळी  : विखे-पाटील

धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार

देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटायला हवी: सुप्रिया सुळे

धर्मा पाटील यांची हत्‍या; सरकारविरोधात गुन्‍हा दाखल करा