मुंबई : पुढारी ऑनलाईन
आम्ही शेतकर्याची पोरं आहोत. आमचा बाप आत्महत्या करताना आम्ही पाहू शकत नाही. कर्जमाफी झालेला एकही शेतकरी सापडत नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर ट्वीट करून सरकारवर शरसंधान साधले आहे.
आम्ही शेतक-याची पोर आहोत, आमचा बाप आत्महत्या करतांना आम्ही पाहू शकत नाही. कर्जमाफी झालेला एकही शेतकरी सापडत नाही, बोन्डअळीची जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे , त्यामुळे शेतक-यांच्या या प्रश्नापेक्षा कोणताही विषय मोठा विषय नाही त्यावर तातडीने चर्चा करावी अशी मागणी आज अधिवेशनात केली.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 6, 2018
राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांना बोंडअळीची जाहीर झालेली मदत तुटपुंजी आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांपेक्षा कोणताही प्रश्न मोठा नाही. त्यामुळे आपण अधिवेशनात शेतकर्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केल्याचे मुंडेंनी म्हटले आहे.