Sat, Mar 23, 2019 02:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारने मराठी भाषेचा अपमान केला : मुंडे(व्हिडिओ)

सरकारने मराठी भाषेचा अपमान केला : मुंडे(व्हिडिओ)

Published On: Feb 26 2018 12:33PM | Last Updated: Feb 26 2018 12:33PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

विधिमंडळाच्या अर्थसंकल्‍पातील राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवादित न केल्‍याने विरोधी पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठी भाषेचा अपमान केला आहे. अशा सरकारचा धिक्‍कार असो, मराठी आमच्या हक्‍काची नाही कोणाच्या बापाची. मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या सरकारचा धिक्‍कार असो. अशा घोषण देत विरोधी पक्षाने भाजप सरकारचा निषेण व्यक्‍त केला. 

आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनात सादर होणारे राज्‍यपालांचे अभिभाषण मराठीत करण्यात आले नाही. त्‍यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून विरोधकांनी सभात्याग केला. 

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्‍हणाले, ‘‘राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून  राज्‍य सरकारने मराठी भाषेचा अपमान केला आहे. गुजराती भाषेचा अनुवाद केला जातो मात्र, मराठी भाषेचा केला जात नाही. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.’’