Wed, Sep 26, 2018 10:52



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकरी गुन्हेगार वाटतात का? धनंजय मुंडे 

शेतकरी गुन्हेगार वाटतात का? धनंजय मुंडे 

Published On: Feb 27 2018 2:57PM | Last Updated: Feb 27 2018 2:59PM



मुंबई : प्रतिनिधी

‘‘शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटया लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का?’’ अशा शब्दात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल  केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोंडअळीचा प्रार्दुभाव, गारपीट आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या या प्रश्नांवर  धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘१७ जिल्हयांचा दौरा केला, एकही कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. गारपीटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. धर्मा पाटील यांना मृत्यू नंतरही न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरु आहेत. शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का?  गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले. शासनाचे अधिकारी म्हणतात कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते?’’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आज मराठी भाषा दिन साजरा करीत असताना मराठी भाषकडेच दुर्लक्ष होत आहे. भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील सचिव, आय.ए.एस. ,आय.पी.एस.अधिकारी मराठीतील टिपणे इंग्रजीत टाकतात. ही मराठीची उपेक्षाच सरकारने चालवली असल्याचे धनंजय मुंडे यांनी  म्हटले.

या वेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला 20 मिनिटे आणि नंतर दिवासभारासाठी तहकुब करण्यात आले.