Fri, Jul 03, 2020 00:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खोटा प्रचार करुन केंद्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Last Updated: May 26 2020 7:10PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसमुंबई : पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारने राज्य सरकारला वेळोवेळी मदत केली आहे. तसेच सर्व राज्यांनाही मदत करत आहे. महाराष्टातील सरकार खोटा प्रचार करुन केंद्राची प्रतिमा मलिन करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. 

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राने महाराष्ट्रातून जवळपास ६०० रेल्वे सोडल्या आहेत. श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी दिलेत. तसेच केंद्राने राज्य सरकारला ४ हजार ५०० कोटींचा कर दिला आहे. एप्रिल व मे महिन्याचा आगाऊ निधीही केंद्राने सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने शेतीसाठी ९ हजार कोटींचा निधी दिला. राज्यात पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठाही केंद्राने केला.